22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीययेदियुरप्पांनी घेतला यू-टर्न

येदियुरप्पांनी घेतला यू-टर्न

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकाच्या राजकारणात दबदबा असलेले नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली होती. त्यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असून मुलाला मतदारसंघ सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उमेदवारीच्या घोषणानंतर त्यांनी यू-टर्न घेतला असून भाजप हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे त्यांनी जाहीर केले आहे.

विजयेंद्र यांना भाजपकडून सातत्याने डावलले जात असल्याची तक्रार येदियुरप्पा यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेती संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. सध्या ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष आहेत. त्यातच येदियुरप्पांनी केलेल्या घोषणेनंतर चांगलीच चर्चा रंगली होती. येदियुरप्पा म्हणाले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. विजयेंद्र यांच्याकडे कुठूनही निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे, पण अंतिम निर्णय हा पक्षाच्या हायकमांडचा आहे. शिवमोग्गामधील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आमदार राहिलेले येदियुरप्पा पुढे म्हणाले, मी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही.

मात्र, पक्षाच्या हायकमांडला माझ्या मुलाला उमेदवारी देण्यास सुचवणार आहे. यापूर्वी येदियुरप्पांनी आपण निवडणूक लढवणार नसून आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले होते. मी निवडणूक लढवत नाही, पण विजयेंद्र शिकारीपुरा येथून निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले होते. मी शिकारीपुरातील लोकांना माझ्यापेक्षा मोठ्या फरकाने माझ्या मुलाला विजयी करावे, यासाठी हात जोडून प्रार्थना करतो असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या