27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीययोग दिन : पंचायत राज मंत्रालयाकडून सरपंचांना पत्र

योग दिन : पंचायत राज मंत्रालयाकडून सरपंचांना पत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत आहे. त्यामुळं भारत सरकारनं ‘ब्रँड इंडिया अ‍ॅट ग्लोबल स्टेज’ यावर लक्ष केंद्रित करुन देशभरातील ७५ राष्ट्रीय स्तरावरच्या प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे.

दरम्यान, पंचायत राज मंत्रालयानं पंतप्रधानांकडून आलेले पत्र देखील सर्व सरपंचांना पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी योग दिन साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान पंचायत राज मंत्रालयानं पंतप्रधानांकडून ६ जून २०२२ रोजी आलेले पत्र देखील सर्व सरपंचांना पाठवले आहे. ज्याद्वारे ग्रामपंचायतींना आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन, विशेष दिवस बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२१ जून, २०२२ रोजी होणा-या सामूहिक योग प्रात्यक्षिकांमध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी व्हावं, यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, योगाच्या अभ्यासासाठी आणि सामूहिक योग प्रात्यक्षिकांसाठी सरपंचांना त्या त्या विभागातील प्राचीन ठिकाणी किंवा पर्यटन स्थळावर अथवा पाणवठ्याजवळील जागा निवडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह हे २१ जून २०२२ रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार या शहरात वसलेल्या हर की पौडी येथे ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं होणा-या सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या