22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीययोगी आदित्यनाथ महाराष्ट्र सदनात!

योगी आदित्यनाथ महाराष्ट्र सदनात!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीपदाचा मान मिळविलेल्या प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आदित्यनाथ यांनी श्री गणेशाची प्रतिमा माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांना भेट दिली. यानिमित्ताने योगी आदित्यनाथ बहुधा प्रथमच महाराष्ट्र सदनात आले.

कोपर्निकस मार्गावरील जुन्या महाराष्ट्र सदनात योगी आदित्यनाथ यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यास हजर रहाण्यासाठी प्रतिभाताई पाटील दिल्लीत आल्या आहेत. श्रीमती पाटील यांच्यानंतरच्या मुर्मू या दुस-या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या