नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत जमियतने उत्तर प्रदेश सरकारला कारवाई थांबवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. योग्य कायदेशीर प्रक्रिया न करता कारवाई केली जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. बुलडोझरच्या कारवाईला जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अलीकडेच उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने अनेक आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवला आहे. रविवारीच प्रयागराज येथील हिंसाचाराचा आरोपी जावेद अहमद पंपच्या घरावर पोलिस प्रशासनाने बुलडोझर चालवला होता.