लखनऊ : कृषि कायद्यांविरोधात उत्तर प्रदेशातही विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुरु केलेली किसान यात्रा योगी सरकारने रोखली असून त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.
प्रशासनाकडून लखनऊमध्ये अखिलेश यादव यांच्या घराबाहेर बॅरिकेडींग करण्यात आली होती.
त्यानंतर याच परिसरात धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय अखिलेश यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर त्यांना ईको गार्डन इथे पाठविले आहे.