16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयतुम्ही करायचं तेवढं नुकसान केले, आता तरी…

तुम्ही करायचं तेवढं नुकसान केले, आता तरी…

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी विनंतीही त्यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोना संकटाचा सामना करण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. सरकारने आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादता कामा नये असंही ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी’ मोहिमेअंतर्गत एक व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, ‘प्रिय विद्यार्थी, तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि तुम्हीच भारताला नव्या उंचीवर नेऊ शकता. गेल्या तीन-चार महिन्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिलं आहे. कोरोना संकट योग्यप्रकारे हाताळलं नाही असं प्रत्येकाला वाटत आहे. आर्थिक नुकसान झालं. लोकांना यातना सहन कराव्या लागल्या’.

‘लोकांना अजून त्रास दिला पाहिजे असं मला वाटत नाही. तुम्ही काही चुकीचं केलं आहे असंही मला वाटत नाही. सरकार असमर्थ ठरल्याचं मला स्पष्ट दिसत आहे. सरकारने तुमच्यावर कोणतीही गोष्ट का लादावी ? सरकारने तुमचं ऐकलं पाहिजे,’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सरकारने कोणताही निर्णय चर्चा केल्यानंतरच घेतला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.

तर आम्ही अमेरिकेची मदत घेऊ

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या