24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeराष्ट्रीयइलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यास मिळणार पैसे

इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यास मिळणार पैसे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन इलेक्ट्रिकल व्हेइकल पॉलिसी लाँच केली आहे. गुरुवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली. केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी जारी केली. केजरीवाल म्हणाले की, आणखी पाच वर्षांनी जर जगात इलेक्ट्रिक व्हेइकलची चर्चा झाली तर तेव्हा दिल्लीचं नाव सर्वात वर असेल. ही पॉलिसी देशातील सर्वात प्रोग्रेसिव्ह पॉलिसी आहे. जगात जितक्या इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी आहेत त्यापैकी एक चांगली पॉलिसी तयार करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहन पॉलिसीअंतर्गत नव्या वाहन खरेदीवर इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे. यामध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा, ई रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांसाठी ३० हजार रुपयांपर्यंत इन्सेंटिव्ह दिला जाईल. तर इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर दीड लाख रुपयांपर्यंत इन्टेंसिव्ह दिला जाणार आहे. केंद्र सरकार त्यांच्या योजनेअंतर्गत जे देत आहे त्यावर हा इन्सेंटिव्ह असणार आहे.

पुढील ५ वर्षांत ५ लाख वाहनांची नोंद करणार
केजरीवाल यांनी सांगितलं की, पुढच्या ५ वर्षात दिल्लीत पाच लाख नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल रजिस्टर करण्यात येतील अशी आशा आहे. येत्या काळात दिल्लीची इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी आणि मॉडेलची चर्चा पुर्ण देशात होईल. मला विश्वास आहे की पाच वर्षानंतर जगातही दिल्लीची इलेक्ट्रिल व्हेइकल पॉलिसी चर्चेत असेल.

एका वर्षात २०० चार्जिंग स्टेशन तयार करणार
इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क तयार करणार आहे. एका वर्षात २०० चार्जिंग स्टेशन तयार करण्याचे ध्येय आहे. दर तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन मिळेल यासाठी तयारी केली जात आहे. नवे तंत्रज्ञान असल्याने तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल संबंधित सर्व कामांसाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यासाठी नोक-याही उपलब्ध होतील. राज्य स्तरावर स्टेट इलेक्ट्रिक व्हेइकल फंड तयार केला जात असून सर्व खर्च याच फंडातून होईल.

वाहनांचा रोड टॅक्स आणि फी पूर्ण माफ
जर तुम्ही तुमचे जुने पेट्रोल किंवा डिझेल वाहन एक्सचेंज करून नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी केलंत तर तुम्हाला सरकारकडून इन्सेंटिव्ह मिळेल. अशा पद्धतीचा इन्सेंटिव्ह देशात पहिल्यांदा दिल्लीत दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेइकल खरेदी करण्यासाठी सरकार कर्जावर व्याजात सूट देईल. तसेच सर्व नव्या इलेक्ट्रिक वाहनांचा रोड टॅक्स आणि फी पूर्ण माफ करण्यात येणार आहे.

Read More  आठ हजार शेतक-यांना मदतीची प्रतिक्षा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या