25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयऑफीसला येऊन झोपण्याचा मिळणार पगार

ऑफीसला येऊन झोपण्याचा मिळणार पगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑफीस किंवा जॉब म्हटले की नुसते काम सुचते. कधी कधी कामाच्या ओघात आपण झोप पण विसरतो. पण आज आम्ही तुम्हाला असा जॉब सांगणार आहोत, जिथे तुम्हाला काम नाही तर झोप घ्यावी लागणार आहे. तुम्हाला वाटेल असा कुठे जॉब असतो का? पण हे खरे. या कंपनीचे नाव कॅस्पर असून सध्या या कंपनीची खुप चर्चा सुरू आहे.

कॅस्पर ही कंपनी गाद्या तयार करण्याचे काम करते. गाद्यां योग्य आहे का हे तपासण्यासाठी त्यांना काही कर्मचारी हवे आहेत. त्यासाठी ही नोकरी उपलब्ध करण्यात आली आहे. जे भरपूर झोप घेतात त्या व्यक्तींनाच या नोकरीसाठी संधी आहे. याशिवाय १८ वर्षावरील व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. तर २२ ऑगस्टही ही शेवटची तारीख आहे. सोबतच या अर्जासोबत स्लीप स्कीलचा व्हीडीओ शेअर करायचा आहे. कंपनीने नोकरी देताना काही अटी ठेवल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या