23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeराष्ट्रीयनैसर्गिक आपत्तींची मिळणार आधीच माहिती

नैसर्गिक आपत्तींची मिळणार आधीच माहिती

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने ‘निसार सॅटेलाईट’ इस्त्रोकडे सोपवला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हे निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एअर फोर्सचे सी-१७ विमान बुधवारी(८ मार्च) बंंगळुरूमध्ये उतरले. या विमानातून नासा-इस्त्रो सिंथेटिक अपर्चर रडार भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रोकडे सुपूर्द करण्यात आले आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा यांच्याकडून संयुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. २०२४ मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने निसार हा सॅटेलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे. या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

२०२४ मध्ये लाँच होईल निसार सॅटेलाईट
नासाने निसार उपग्रहाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिगसाठी इस्त्रोकडे पाठविण्यात आला आहे. आता इस्त्रो यावर काम करेल, त्यानंतर २०२४ मध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, निसार उपग्रह बंगळुरू येथे दाखल झाला. इस्रोकडे नासाकडून कॅलिफोर्नियातीहून रवाना झालेला उपग्रह पोहोचला आहे. अमेरिकन वायुसेनेच्या सी-१७ विमानाने हा उपग्रह भारतात नेण्यात आला. हा दोन देशांमधील अंतराळ सहकार्याचा एक भाग असून याचाच एक प्रतीक आहे.

उपग्रह किमान तीन वर्षे काम करणार
निसार उपग्रह हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल. याचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्रे शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल. सर्वकाही सुरळीत पार पडले तर, निसार उपग्रह २०२४ मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल. हा उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह १२ दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या