31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयतरुणांकडे शस्त्रांशिवाय पर्याय नाही

तरुणांकडे शस्त्रांशिवाय पर्याय नाही

एकमत ऑनलाईन

जम्मू : काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा कलम ३७० च्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, आज काश्मीर घाटीतील तरूणांकडे नोकरी नाही, त्यामुळे त्यांच्या समोर आता शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आज दहशतवादी कॅम्पमधील भरती वाढत आहे.

मुफ्ती यांनी आरोप केला आहे की, भाजपा जम्मू-काश्मीरची जमिनीची विक्री करू इच्छित आहे. आज बाहेरून येऊन लोक इथे नोकरी करत आहेत. मात्र आपल्या मुलांना नोकरी मिळत नाही. त्या सध्या जम्मू दौ-यावर आहेत. या दरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेद्वारे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कलम ३७० वरून मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, हा मुस्लीम व हिंदूंचा विषय नाही.

जम्मू-काश्मीर लोकांची ओळख आहे. लोकांना आपल्या भविष्याची चिंता आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे़ या अगोदर देखील मुफ्तींनी सातत्याने कलम ३७० वरून केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली होती. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवे, असे मुफ्ती म्हणाल्या होत्या.

दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या