22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

आरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

एकमत ऑनलाईन

शिमला : चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीक प्रकरणी शिमला येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. यापूर्वी पंजाब पोलिसांनी चंदीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थीनीला अटक केली होती. वसतिगृहातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून शिमल्यात राहणाऱ्या तिच्या प्रियकराला पाठवल्याचा आरोप तरुणीवर आहे. मात्र, पोलिस आणि विद्यापीठाने हा दावा फेटाळून लावला होता.

युनिव्हर्सिटीच्या प्रो-चान्सलरनी सांगितले होते की, आरोपी विद्यार्थिनीने फक्त स्वतःचे व्हिडीओ काढून पाठवला होता. दरम्यान या प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ माजली असून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी शिमला येथून अटक करण्यात आलेल्या २३ वर्षीय व्यक्तीचे नाव सनी मेहता असे असून तो शिमल्याच्या रोहरू येथील रहिवासी आहे. दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेली महिला विद्यार्थिनीही मूळची रोहरू येथील आहे.

दरम्यान आरोपी तरुणाच्या शोधात पंजाब पोलीस शिमल्यात पोहोचले होते. तरुणीने तिच्या मोबाईलमधील आरोपी तरुणाचा फोटोही दाखवला होता. पंजाब पोलिसांनी सांगितले होते, ती मुलगी शिमल्यात राहणाऱ्या आरोपी तरुणाला ओळखत होती. विद्यार्थ्याच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर उर्वरित माहिती बाहेर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या