रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी विधानसभेत पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षाअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा २५०० रुपये बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत ही माहिती दिली.