हैद्राबाद : मागील काही वर्षांमध्ये पक्षांमध्ये उभी फूट पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या शिवसेना पक्षावर अशी स्थिती आली आहे. मात्र आंध्रप्रदेशमध्ये वायएस जगनमोहन रेड्डी यांना वायएसआर काँग्रेस पक्षाचे आजीवन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे.
पक्षफुटीच्या भीतीने तर आजीवन अध्यक्ष होण्याचा निर्णय जगनमोहन रेड्डी यांनी घेतला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वायएसआरसीपीच्या आजीवन अध्यक्षपदासाठी जगनमोहन रेड्डी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र त्यांना कोणीही आव्हान न दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी एकमताने रेड्डी यांना विजयी घोषित केले.