नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कमांडोजची झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिका-यांनी शुक्रवारी दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेला सिन्हा यांच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आल्यानंतर सिन्हा यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांनी स्वीकारली आहे.