राष्ट्रवादी पवार गट एकवटला

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या विधानावरून राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ उडाला आहे. पण यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आज सांगलीत एकटवला.

यातून शरद पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत राज्यातील सत्ताधा-यांना सूचक इशारा देण्याचे टायमिंग साधले. परंतु सांगली इथल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात सगळ्यात जास्त लक्ष लागले होते ते पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्याकडे! जयंत पाटील यांच्याशी त्यांचा पक्षातंर्गत असलेला संघर्ष बाजूला सारला आणि सांगलीत जात जयंत पाटलांबरोबर उभे राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष मध्यंतरी चांगलाच विकोपाला पोचला गेला होता. जयंत पाटील यांनी सात वर्षांनंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोडली. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यातून पक्षात रचनात्मक बदल करण्याचा सूर आमदार रोहित पवार यांनी आळवला होता. यातून ते जयंत पाटील यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. यातून दोघांमध्ये राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडत होत्या.

पक्षाच्या रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात जयंत पाटीलांनी काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला राज्यात सरकार आणू द्या. त्यानंतर मी स्वत:च ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर, थेट शरद पवारांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर, त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका असे फटकेबाजी केली होती.

लोकसभा निवडणूक निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी ‘संघर्षातही न डगमगणा-या युवा नेतृत्वाचा उदय’ असे जाहिरात स्वरुपातील लेख प्रसिद्ध केले, तर जयंत पाटील यांच्यातर्फे ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याची जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या दोघा नेत्यांमील ही विसंगती राज्यात चर्चेची ठरली असताना रोहित पवार यांनी, विजयाचा कोणी एक सेनापती नाही, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे सामूहिक असल्याचे जाहीरपणे सांगून, वादावर पडदा घातला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53

Latest news