नीट पेपरफुट; आरोप निश्चितीचा आदेश रोखला

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट यूजी) पेपर लीक प्रकरणातील आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरूवार दि. २९ ऑक्टोबर रोजी राखून ठेवला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात १४ जणांना आरोपी केले आहे. न्यायालय यावर १८ नोव्हेंंबर रोजी आपला आदेश सुनावणार आहे.

नीट यूजी पेपर लीक प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय ने मे महिन्यात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी सीबीआयने जुलै महिन्यात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर १४ व्या आरोपी, शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मुख्य आरोपपत्राची दखल घेतली होती. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी सीबीआय आणि आरोपी शेषराव बजरंग सूर्यवंशी यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश राखून ठेवला.

२ सप्टेंबर रोजी सूर्यवंशीच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सीबीआयच्या वतीने वरिष्ठ सरकारी वकील व्ही. के. पाठक यांनी बाजू मांडली. सीबीआयने मुख्य आरोपपत्रात ज्या इतर १३ आरोपींची नावे दिली आहेत, त्यांच्या संदर्भातील युक्तिवाद न्यायालयाने यापूर्वीच ऐकून घेतले आहेत.

आरोपपत्रात १३ जणांचा समावेश
या प्रकरणातील इतर १३ आरोपींमध्ये मनीषा मंधारे, मनीषा संजय हवालदार, मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज रघुनाथ मोटेगावकर, डॉ. मनोज शिरुरे, तेजस हर्षद शहा, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, यश यादव, मांगीलाल बिवल, दिनेश बिवल आणि विकास बिवल यांचा समावेश आहे.

सीबीआय तपासात ठोस माहिती समोर
सीबीआय चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी शेषराव याने सह-आरोपी शुभम खैरनार याच्यासोबत गुन्हेगारी कट रचून नीट-यूजी २०२६ परीक्षेपूर्वी काही उमेदवारांना परीक्षेतील कथित प्रश्न (जे लीक झाले होते) उपलब्ध करून दिले होते. त्या बदल्यात उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल केले होते. याव्यतिरिक्त, असेही समोर आले आहे की, आरोपीने उमेदवारांना नांदेडमधील एका घरी नेले. तेथे त्यांना नीट-पीजी २०२६ परीक्षेतील कथित लीक झालेले प्रश्न देण्यात आले. भविष्यात पैशांची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी त्याने उमेदवारांची मूळ कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वत:कडे गहाण म्हणून ठेवून घेतली होती. सीबीआयने न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपी आणि त्याच्या जवळच्या सहका-यांविरुद्ध सुरू असलेला तपास सध्या एका निर्णायक टप्प्यावर आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news