23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमनोरंजननिशिगंधा वाड यांचा शूटिंग दरम्यान अपघात, रुग्णालयात दाखल

निशिगंधा वाड यांचा शूटिंग दरम्यान अपघात, रुग्णालयात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था
सिनेसृष्टीतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंग दरम्यान त्यांचा हा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान हा अपघात झाला आहे. या मालिकेत निशिगंधा वाड सुमित्रा मित्तल नावाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा एक सीन शूट होत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना सेटवरील लोकांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. या अपघातामुळे सेटवरील कलाकारांनाही धक्का बसला आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांनी काही दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR