15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeराष्ट्रीयकबुतरखाना प्रकरणात हस्तक्षेप नाही

कबुतरखाना प्रकरणात हस्तक्षेप नाही

नवी दिल्ली : कबुतरांना खाऊ घालण्याच्या मुंबईतील ‘कबुतरखाना’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दादर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि नियम तोडून खाऊ घालणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे.

दरम्यान, मुंबईतील दादर येथील कबुतरखाना आणि इतर ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई सुप्रीम कोर्टाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात काही याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

त्यांनी कबुतरांना खाऊ घालणे ही धार्मिक आणि सामाजिक परंपरा असल्याचे म्हटले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचे सूचित केले आहे. या निर्णयामुळे आता कबुतरांना खाऊ घालणा-यांविरोधात बीएमसी कठोर कारवाई करू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR