शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतक-यांकडे, महिलांकडे बळजबरीने किंवा दबाब आणून कर्जाची वसुली करू नये, असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिला. दुष्काळामुळे वसुली शक्य नसताना कर्ज परतफेडीची सक्ती न करता अशा कर्ज प्रकरणांचे नियमांनुसार पुनर्गठन करण्यात यावे, असे निर्देशही बावनकुळे यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिले.

दुष्काळ निवारण उपाययोजनांच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील आज पार पडली.या बैठकीत ग्रामीण भागातील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुलीचा मुद्दा चर्चेला आला. यावेळी बावनकुळे यांनी मायक्रो फायनान्सच्या अध्यक्षांनाच बैठकीत बोलावून जाब विचारला. अनेक ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्या नियमांचे उल्लंघन करून उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज वाटप करत असल्याच्या तक्रारी नांदेड, लातूरसह विविध भागांतून प्राप्त होत आहेत. बहुतांश कर्ज हे महिलांच्या नावावर असून त्यांची मर्यादा ५५ हजार रुपयांपर्यंत असून ती दोन वर्षांत परतफेडीची असते याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

मागील दोन वर्षांतील पाणीटंचाईच्या कामांचे थकीत पैसे तात्काळ अदा करण्यात यावे. अन्यथा शेतकरी विहिरी अधिग्रहित करू देणार नाहीत, असा स्पष्ट करत महसूल मंर्त्यांनी सर्व थकीत रक्कम २० नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचे सक्त निर्देश दिले. रोजगार हमीच्या माध्यमातून व्हीबीजी रामजी अंतर्गत होणा-या कामांच्या मजुरांचे दर वाढवण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आगामी १० दिवसांत यावर शासन निर्णय घेतला जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

अपूर्ण जलजीवन मिशनची कामे, फळबाग संरक्षण आणि चारा जवळच्या जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णयही उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. १५ नोव्हेंबरपर्यंत ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news