29.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

बंगळूरू : कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पॉक्सो प्रकरणात बंगळुरू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. अटकेच्या भीतीने येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती.

१७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यानुसार खटला चालवला जात आहे. लैंगिक छळ प्रकरणी सीआयडीने बुधवारी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना चौकशीसाठी बोलावले. येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली. पण, आज गुरुवारी बंगळुरू न्यायालयाने बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

मुलीच्या आईने १४ मार्च रोजी सदाशिवनगर पोलिस ठाण्यामध्ये येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पॉक्सो आणि कलम ३५४ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली, तेव्हा ते एका प्रकरणात मदतीसाठी येडीयुरप्पा यांच्या घरी गेले होते असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यात त्यांनी म्हटले की, कारण हा खटला रद्द करण्यात यावा, कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासारखे काहीही नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR