Homeमनोरंजन"शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं!" – सलमानचा 'स्वॅग' आणि प्रेक्षकांचा जल्लोष

“शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं!” – सलमानचा ‘स्वॅग’ आणि प्रेक्षकांचा जल्लोष

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर (१ मे २०२६) प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात सलमान खान एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. चित्रपटाच्या एका प्रभावी दृश्यात सलमान खान शत्रूच्या मानेवर तलवार रोखतो आणि डोळ्यात अंगार आणून अत्यंत करारी आवाजात एक संवाद आहे

“शिवाजी नाही… शिवाजी राजं म्हणायचं!”

हा संवाद ऐकताच चित्रपटगृहात प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट केला आहे. सोशल मीडियावर या सीनचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, सलमानचा हा ‘मराठमोळा स्वॅग’ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सलमान खानने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान अंगरक्षक ‘वीर जीवा महाले’ यांची भूमिका साकारली आहे. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा ऐतिहासिक संदर्भ या भूमिकेतून मांडण्यात आला आहे. डोक्यावर भगवा फेटा, कपाळावर टिळा, पिळदार मिश्या आणि अंगात मराठमोळा पेहराव अशा रूपात सलमानने पडद्यावर एन्ट्री घेताच प्रेक्षक भारावून गेले आहेत. रितेश देशमुख (शिवाजी महाराज) आणि सलमान खान (जीवा महाला) यांना एकत्र पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे.

रितेश यांनी सांगितला पडद्यामागचा किस्सा
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश यांनी खुलासा केला की, सलमान खानने या भूमिकेसाठी स्वतःहून विचारले होते. “तू माझ्याशिवाय हा चित्रपट बनवूच शकत नाहीस, मला यात असायलाच हवं,” असे म्हणत सलमानने या ऐतिहासिक प्रोजेक्टचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

एकूणच, “शिवाजी राजं म्हणायचं!” हा सलमान खानचा संवाद केवळ चित्रपट पुरता मर्यादित न राहता, तो आता शिवप्रेमी आणि सलमानच्या चाहत्यांसाठी एक ‘ट्रेडमार्क’ बनला आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR