आता मालगाडीही १४५ किमी प्रति तास वेगाने धावणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. वंदे भारत कार्गो ट्रेनच्या वेगाची चाचणी यशस्वी झाली आहे. वंदे भारत कार्गो ट्रेन आता प्रवासी ट्रेनप्रमाणे १४५ किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आणि सज्ज झालेली आहे. यामुळे मालवाहतुकीत एक नवीन अध्याय प्रारंभ होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.

वंदे भारत चेअर कार, वंदे भारत स्लीपर ट्रेन, वंदे भारत मेट्रो यानंतर आता वंदे भारत या संकल्पनेवर तयार करण्यात आलेली वंदे भारत कार्गो ही मालवाहतुकीसाठी विशेष करून तयार करण्यात आलेली ट्रेन लवकरच सेवेत येऊ शकते, अशी शक्यता आहे. देशातील विविध भागात या ट्रेनची चाचणी सुरू आहे. या चाचणीवेळी वंदे भारत कार्गो ट्रेनने ताशी १४५ किलोमीटरचा कमाल वेग गाठला. सध्या पश्चिम मध्य रेल्वेच्या (हउफ) कोटा विभागात या चाचण्या घेतल्या जात आहेत. देशभरातील मालवाहतुकीला गती देणे आणि भारतीय रेल्वेचे लॉजिस्टिक्स नेटवर्क अधिक आधुनिक व कार्यक्षम बनवणे, हे या नवीन मालगाडीचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या पहिल्या वंदे भारत कार्गो ट्रेनच्या चाचणीत अनेक तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या घेण्यात येतील. दररोज किमान दोन फे-या चालवल्या जातील. चाचणीसाठी कमाल वेग ताशी १४५ किमी निश्चित करण्यात आला आहे. कोटा विभागात मजबूत रेल्वे ट्रॅक नेटवर्क, आधुनिक सिग्नलिंग प्रणाली, कार्यक्षम परिचालन प्रणाली आणि सुरक्षित हाय-स्पीड चाचणी कॉरिडॉर यांमुळे हा विभाग नवीन ट्रेन आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी आदर्श ठरतो. परिणामी, येथे अनेक नवीन ट्रेन आणि तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

एक महिन्याचा चाचणी कार्यक्रम तयार
भारतीय रेल्वेने वंदे भारत कार्गो ट्रेनसाठी एक महिन्याचा चाचणी कार्यक्रम तयार केला आहे. या कालावधीत, कोटा-नागदा-सवाई माधोपूर रेल्वे मार्गावर विविध वेग आणि परिचालन परिस्थितींमध्ये ट्रेनची चाचणी घेतली जाईल. कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सौरभ जैन यांच्या मते, ही देशातील पहिली १६ डब्यांची वंदे भारत प्लॅटफॉर्म-आधारित मालवाहू ईएमयू प्रोटोटाइप रेक आहे. भारतीय रेल्वेवरील पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवा अधिक जलद, अधिक वक्तशीर आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे.

१६ कोच, मोठे स्वयंचलित दरवाजे
या वंदे भारत कार्गो ट्रेनला १६ कोच आहेत. माल चढवणे आणि उतरवणे सोपे व्हावे यासाठी सर्व कोचमध्ये रोलर बेड बसवलेले आहेत. मोठे स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत. ३९७ टनांपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता आहे. नाशवंत वस्तू कमी तापमानात वाहून नेण्यासाठी चिलर्ससोबत रेफ्रिजरेटेड (रीफर्स) आणि फोर्ड व्हेंटिलेशन देखील बसवले जाणार आहेत. याशिवाय, प्रत्येक कोचमध्ये बसवलेले सेन्सर्स ट्रेनचा वेग, वजन आणि सुरक्षा यांचा आढावा घेण्यासाठी सक्षम ठरणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news