Homeराष्ट्रीयआता २५ दिवसांत गॅस सिलिंडर बुक करता येणार

आता २५ दिवसांत गॅस सिलिंडर बुक करता येणार

शहरी भागांसाठी नवी नियमावली जारी ग्रामीण भागांत ४५ दिवसांची मर्यादा कायम बुकिंगनंतरही करावी लागतेय बरीच परीक्षा?

नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडरबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये चिंता असल्याचे दिसत आहे. परंतु भारत सरकारने स्पष्ट केले आहे की देशात एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे साठेबाजी करू नका आणि घाबरून बुकिंग करण्याची घाई करू नका, असा आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. एलपीजी सिलिंडर बुकिंगसंदर्भातले नवे नियम पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहेत. आता शहरी भागात २५ दिवसांच्या आत सिलिंडर बुक करता येणार आहे. पण गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तो तुम्हाला किती दिवसांत मिळेल, हे माहीत आहे का?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, एलपीजी सिलिंडर वितरणाला पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे.

पूर्वीच्या तुलनेत सिलिंडर वितरणात थोडा विलंब होत आहे. पूर्वी सिलिंडर दोन ते तीन दिवसांत मिळायचं, पण आता नागरिक घाबरून अधिक प्रमाणात बुकिंग करत आहेत. त्यामुळे डिलिव्हरीला चार ते पाच दिवस किंवा काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त काळ लागू शकतो, असे त्या म्हणाल्या. ही परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. एलपीजीच्या पुरवठ्याबाबत दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आता सरकारने ग्राहकांना घाबरून खरेदी न करण्याचा आणि अनावश्यक एलपीजी बुकिंग न करण्याचा इशारा दिला आहे.

एलपीजी सिलिंडरसाठी अनेक नागरिक थेट वितरकांकडे जाऊन रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना डिजिटल बुकिंग माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून वितरण सुव्यवस्थित होईल आणि पुरवठ्यातील व्यत्यय टाळता येईल. त्यातही अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड अनिवार्य करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR