Homeअंतरराष्ट्रीयआता रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम

आता रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम

३२ तास तोफा शांत राहण्याची घोषणा इस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचा निर्णय

मास्को : मध्य पूर्वेमध्ये गेल्या ४० दिवसांसाठी सुरू असलेले युद्ध तुर्तास थांबले आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये १४ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर आता गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेल्या रशिय- युक्रेन युद्धाबाबतही मोठी बातमी आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली असून युक्रेनही याचे पालन करेन असा विश्वास व्यक्त केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर ३२ तासांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. युक्रेनही याचे पालन करेन, अशी आशाही पुतिन यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आल्याचे वृत्त आहे.रशियाच्या सैन्य कमांडर्सना सर्व आघाड्यांवर सैन्य कारवाया थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शत्रू पक्षाकडून चिथावणीखोर कारवाई झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन सैन्य सज्ज राहणार आहे.

आवाहनाला समर्थन
या वर्षी रशियामध्ये १२ एप्रिल रोजी इस्टर आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते १२ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत हा युद्धविराम असणार आहे. युक्रेन रशियन फेडरेशनच्या या आवाहनाचे अनुसरण करेल, या आधारावर आम्ही कार्यवाही करत आहोत, असे रशियाने युद्धविरामाची घोषणा करताना म्हटले आहे.

यूक्रेनकडून निर्णयाचे स्वागत
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. युक्रेनने यापूर्वीच इस्टरसाठी युद्धविरामचा प्रस्ताव अमेरिकेमार्फत मांडला होता. लोकांना धमक्यांशिवाय इस्टर साजरा करण्याची संधी मिळाली पाहिजे. रशियाकडे सणानंतर पुन्हा युद्ध सुरू न करण्याची एक संधी आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR