23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeसोलापूरराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत नूतन विद्यालय द्वितीय

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत नूतन विद्यालय द्वितीय

सेलू : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व गट साधन केंद्र सेलूच्या वतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेची तालुकास्तरीय फेरी नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातील १६ शाळांनी सहभाग नोंदविला. यात नूतन विद्यालयाच्या नाटिकेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, सुनीता काळे, अंजली पद्माकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, विज्ञान नाट्योत्सव स्पधेर्चे परीक्षक प्रा. किशोर विश्वामित्रे, माजी मुख्याध्यापक नागेश देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक गौतम सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

नूतन विद्यालयातील मराठी विषयाचे सहशिक्षक सुरेश हिवाळे यांचे दिग्दर्शन असलेली जल हेच जीवन या नूतन विद्यालयाने सादर केलेल्या नाटिकेला तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. नाटिकेत अक्षरा बोकन, श्रीनिवास देवकर, दुर्गा मगर, सान्वी हेलसकर, शिवानी डहाळे, मृण्मयी इक्कर, तीर्थेश संघई, शाश्वत संघई या बालकलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांची मने जिंकली. नाटिकेला सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीत दिले तर फुलसिंग गावित, केशव डहाळे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली.

अतुल पाटील, डॉ. संतोष मलसटवाड यांनी नाटिकेच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. या यशाबद्दल नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR