लठ्ठ आणि मधुमेहींना अमेरिकेत प्रवेश निषिद्ध

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावला. भारतीय लोक मोठ्या संख्येत अमेरिकेत एच-१बी व्हिसावर जाऊन नोक-या करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. व्हिसावरील शुल्क वाढून ८८ लाख केले. आता एच-१बी व्हिसा मिळवण्यासाठी ८८ लाख रूपये मोजावी लागणार आहेत. हा मोठा धक्काच भारतीयांना आहे.

एच-१बी व्हिसाच्या नियमातील बदलानंतर डोनाल्ड ट्रम्प सरकारने ग्रीन कार्डबदलचाही नियम बदलला आहे. जर तुम्हाला मधुमेहासारखी काही आजार असतील तर तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकार मागील काही दिवसांपासून सतत व्हिसाच्या नियमात बदल करताना दिसत आहे. एच-१बी व्हिसामुळे लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोक-या करत असल्याने अमेरितील लोकांना नोक-या मिळत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

अमेरिकेतील लोक आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर अमेरिकेतील लोकांच्या किती जास्त प्रमाणात नोक-या जात असल्याची त्यांनी आकडेवारी जाहीर केली. आता अमेरिकेत जाऊन नोकरी करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. आता त्यांनी अमेरिकेतील ग्रीन कार्डच्या नियमात देखील मोठा बदल करत मधुमेहासारखी आजार असलेल्या लोकांना ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून सरकारी निर्देश देत सांगण्यात आले की, अमेरिकेत व्हिजासाठी अर्ज करणा-या व्यक्तीला वजनाची समस्या किंवा मधुमेहासारख्या आरोग्य समस्या असतील तर त्याला व्हिसा नाकारला जाऊ शकतो. विदेश मंत्रालयाने सर्व दूतावासांना एक संदेश पाठवला असून त्यामध्ये स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, आजारी लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला तर ते ओझे बनतील.

अमेरिकेतील संसाधन खराब करू शकतात. लठ्ठपणा, हदयरोग, श्वनाच्या समस्या, कॅन्सर, मधुमेह, मेटाबॉलिक डिसऑर्डर आणि मानसिक रोग या रोगांचा उल्लेख करण्यात आला. त्यांचे म्हणणे आहे की, अशा आजाराने ग्रस्त लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला तर त्यांच्यावर लाखो डॉलर खर्च होतील. काहीही करून डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत येणा-या लोकांची संख्या कमी करायची हे यावरून स्पष्ट होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news