मुंबई : हुडी घातलेली, लॅपटॉवर टायपिंग करणारी आणि लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती अशी सायबर गुन्हेगारांची प्रतिमा मागे पडली आहे. सध्या सायबर फसवणूक करणा-यांकडे एखाद्या कारखान्याप्रमाणे मोठी यंत्रणा आहे, तेथे सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जात आहे.
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावरील वावर वाढला. त्यात सायबर गुह्याच्या संकटात भर पडली. घरातली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर होऊ लागली. याचाच फायदा सायबर भामटे घेताना दिसत आहे. यातच महिलांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात फेक सोशल मिडिया प्रोफाईल, मॉर्फिंग, ई-मेल, एसएमएसचे ६० गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यापैकी २८ गुन्ह्यांची उकल करत १३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. व्हॉटसअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, या माध्यमांवर टिनेजरपासून तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठांचाही वावर वाढतोय. त्यात आपले फोटो, माहिती सहजपणे शेअर केली जाते. सोशल मीडियावरील मोकळेपणाच ही मंडळी हेरतात.
सायबर गुन्हेगारी आता जगातील सर्वात मोठे संघटित गुन्हेगारी नेटवर्क बनले आहे. बनावट नोटा किंवा अंमली पदार्थांची तस्करी यापेक्षाही हे मोठे संकट आहे. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांमधून झालेल्या उत्पन्नाने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे यावेळी यादव यांनी सांगितले. तसेच यादव पुढे म्हणाले की, पूर्वी आपण सायबर गुन्हेगाराला लॅपटॉपवर बसून हॅकिंग करणारा समजत होतो, पण आता त्यांच्याकडे एखाद्या कारखान्याप्रमाणे मोठी यंत्रणा आहे, तेथे सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जात आहे. झारखंडमधील जामतारा हे असे केंद्र बनले आहे, गेल्या वर्षी तेथील दोन गुन्हेगारांनी हेलिकॉप्टरही विकत घेतले होते. त्यावरून त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज येऊ शकतो. ही लढाई जगातील सर्वात मोठ्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटविरोधात आहे. भारतात सुमारे ७० कोटी स्मार्टफोन आहेत. पण आपल्याकडे पुरेशी सायबर सुरक्षिततेची जाणीव आहे का? आपण सायबर सुरक्षिततेच्या सवयी आत्मसात केल्या आहेत का? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
अशा प्रकारे घेतला जातो गैरफायदा
एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद म्हणून हाय जरी केले, तरी ती आपल्याला लाईक्स करते, असा समज बनला आहे. त्यातूनच त्याचा सोशल मीडियावर स्टॉकिंग म्हणजेच पाठलाग सुरू होतो. वारंवार मेसेज करणे. त्याला फोटो, व्हिडीओ शेअर करून भेटण्यास बोलावणे, मैत्री, प्रेमात शेअर केलेले व्हीडीओ, फोटो मॉर्फ करून गैरफायदा घेण्यात येतो.
नकार देताच ब्लॅकमेलिंग
महिलेकडून नकार येताच तिला ब्लॅकमेल केले जाते. बदला घेण्यासाठी बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केल्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचे आतापर्यंतच्या कारवायांतून स्पष्ट झाले.
















