दुबई : आशिया कप ग्रुप-अ सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १२७ धावा केल्या. साहिबजादा फरहानने ४० आणि शाहीन शाह आफ्रिदीने ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या. भारताला विजयासाठी १२८ धावांची गरज असताना भारताने ३ गडी गमावून १६ षटकांत सुर्यकुमारने ६ मारून १३१ धावांची नोंद करीत दमदार विजय मिळविला.
ग्रुप-अ सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पॉवरप्लेमधूनच दबाव निर्माण केला आणि शेवटपर्यंत पाकिस्तानी फलंदाजांना सावरण्याची संधी दिली नाही. साहिबजादा फरहान(४० धावा) आणि शाहीन आफ्रिदी(३३ धावा) व्यतिरिक्त कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने २-२ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारतीय संघाकडून सलामीवीर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी ३१-३१ धावांची खेळी केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ४७ धावा केल्या. सूर्य-तिलक यांनी तिस-या विकेटसाठी ५६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन विकेट्स घेतल्या.
या विजयासह, भारत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि संघाची सुपर-४ मध्ये पोहोचण्याची शक्यताही वाढली आहे. दुसरीकडे, जर पाकिस्तानला पुढील फेरीत प्रवेश करायचा असेल, तर त्यांना युएईविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल.
















