अमरावती : राज्याच्या महसूल व वन विभागाने बहुप्रतीक्षेनंतर ५० वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या (आरएफओ) विनंती बदल्यांचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले आहेत. यात आरएफओंच्या पदस्थापनेत अंशत: बदल करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये अनेकांना ‘स्पीड ब्रेकर’ लागले होते. परंतु, या सर्व अडचणींवर मात करीत आता आरएफओंनी विनंती बदल्यांमध्ये बाजी मारल्याचे चित्र आहे.
अभिजीत ठाकरे (अकोट, वन्यजीव), ललिता सूर्यवंशी (हातकणंगले), सुनील वाकोडे (बुलडाणा प्रादेशिक), कोमल पिंडकुरवार (चाळीसगाव प्रादेशिक), जी. बी. लांबाडे (आर्वी सामाजिक), महेंद्र दबडे (रोहा प्रादेशिक), अरूप कन्नमवार (नागभिड), सुनील मेहरे (संभाजी नगर), मोहन शेळके (अहिल्यानगर), चेतन
पाटील (तासगाव), नरेश भोवरे (वरोरा), अंगद खटाणे (भोकर प्रादेशिक), अनिल रासणे (नांदेड प्रादेशिक), मंगेश पाटील (हिमायतनगर), गणेश शेवाळे (बीड), विशाल गोदडे (ठाणे), प्रदीप चव्हाण (तुळशी, बोरीवली), रामचंद्र शेंडे (मूल, चंद्रपूर), प्रदीप मोडवान (कांदळवन, पालघर), साबु बिराजदार (जत, सांगली), श्रीकांत काळे (रावेर), तुकाराम जाधवर (बारामती), सागर मगर (सांगोला, सोलापूर), राहुल कारेकर (नागपूर), अमोल काशीकर (नवापूर), अर्जुन गंबरे (सातारा), कैलास सोनवणे (शिरपूर), संजय रघतवान (कोरेगाव), प्राची बिसेन (पुणे), चेतन राठोड (दिग्रस), श्रीनिवास कटकु (पेडीगुंडम, आलापल्ली), नितीन वाघ (नंदूरबार), स्वप्नील पवार (खामगाव), प्रिया काळे (छत्रपती संभाजी नगर), प्राशा पगार (चिचपाडा, नंदूरबार),
संतोष शिरशेटवार (मांडवी, नांदेड), दिनेश देसले (मुरवाड, ठाणे), मनोजकुमार कोळी (ईस्लामपूर, सांगली), सचिन सावंत (आजरा, कोल्हापूर), विजय गंगावणे (खापा, नागपूर), विनोद दळवी (मोखडा, जव्हार), गायत्री सोनवणे (मालेगाव, नाशिक), नरेंद्र मुठे (ठाणे), विवेक येवतकर (अमरावती), प्रियंका भिसे (वैजापूर, संभाजी नगर), शेषराव टुले (देवलापार, नागपूर), सागर आरडेकर (उधवा, डहाणू), शेख लियाकत अली (धारणी, मेळघाट), वर्षा हरणे (अमरावती), प्रदीप भड (वडाळी, अमरावती) अशा विविध ठिकाणी विनंती बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

