25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeउस्मानाबादआ. ज्ञानराज चौगुले यांच्यासमवेत दिव्यांग बांधवांनी केला जल्लोष

आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासमवेत दिव्यांग बांधवांनी केला जल्लोष

एकमत ऑनलाईन

उमरगा : शिवसेना-भाजप युती सरकारने राज्यातील अपंग, दिव्यांग बांधव, भगीनींची अनेक वर्षांपासूनची असलेली अपंग मंत्रालयाची मागणी पूर्ण केली आहे. दिव्यांग मंत्रालयाला नुकतीच मंजुरी दिली आहे. याबद्दल शनिवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासमवेत साखर वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष इसाक शेख, तालुकाध्यक्ष रामेश्वर मदने, वासुदेव काशीद, नारायण भुसने, विशाल सुरवसे, गुंडू अनगिरे, फारुख बागवान, अखिल जमादार, सोहेल जमादार, भैरू पाटील, राहुल मनाळे, वर्ष कांबळे, निर्मला सुरवसे, नागराज मसरे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या