22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादउमरगा तालुक्यातील अचलेर येथे एकाची ऑनलाईन फसवणूक

उमरगा तालुक्यातील अचलेर येथे एकाची ऑनलाईन फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील अचलेर येथे एकाची ८५ हजार ५२५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. दुकानाचे साहित्य ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम देवूनही साहित्य दिले नाही. या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी मुरूम पोलिस ठाण्यात राजस्थान राज्यातील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील अचलेर येथील महेश बाळासाहेब मलकुंदे यांना दुकानासाठी ऑनलाईन साहित्य खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर माहिती घेवून उगमाराम पेमाराम सुतार, रा. जोधपूर, राजस्थान यांना संपर्क साधला. उगमाराम सुतार यांनी वेगवेगळ्या बहाण्याने ८५ हजार ५२५ रूपये मलकुंदे यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने स्विकारली. यानंतर सुतार यांनी मलकुंदे यांना माल न पुरवता घेतलेले पैसेही परत न केल्याने फसवणूक झाल्याचे मलकुंदे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी महेश मलकुंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या