22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत एकाची 2.12 लाखाची ऑनलाईन फसवणूक

उस्मानाबादेत एकाची 2.12 लाखाची ऑनलाईन फसवणूक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : मोबाईलवर आलेल्या ंिलकवरील ऍप्लीकेशन घेवून त्यामध्ये क्रेडीट कार्डचा क्रमांक, पासवर्ड अशी माहिती भरल्यानंतर एकाचे 2 लाख 12 हजार 803 रूपये ऑनलाईन पद्धतीने लंपास करण्यात आले. या प्रकरणी उस्मानाबाद येथील अक्षय संजय नायगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील समतानगर येथील अक्षय नायगावकर यांनी त्यांच्या स्मार्टफोनवरील संदेशात आलेल्या ंिलकवरील पलीकेशन घेवून त्यात त्यांनी आपल्या क्रेडीट कार्डचा क्रमांक, पासवर्ड अशी वैयक्तीक माहिती भरली. त्या माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने नायगावकर यांच्या बँक खात्यातील 2 लाख 12 हजार 803 रूपये रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्यत्र स्थलांतरीत करुन नायगावकर यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अक्षय नायगावकर यांच्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या