25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeउस्मानाबादऊसाचा फड पेटविला, चौघावर गुन्हा दाखल

ऊसाचा फड पेटविला, चौघावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : आरोपींनी संगणमत करून गोजवाडा ता. वाशी येथील शेतकर्‍याचा ऊसाचा फड पेटवून दिल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात ६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी सांगितले की, गोजवाडा ता. वाशी येथील शेतकरी बापू विठ्ठल कदम यांचा चौघा आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीच्या यांच्या गोजवाडा गट क्र. २४७ मधील शेतातील ऊस पिकापैकी १६ मेट्रीक टन ऊस तोडून घेवून गेले व उर्वरीत अंदाजे ९० मेट्रीक टन ऊस घेवून न जाता फिर्यादीच्या विरोधात असलेल्या रोषातून उर्वरीत ९० मेट्रीक टन ऊस पिक पेटवून देवून फिर्यादीचे अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी रमाकांत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव राऊत, विष्णू उंदरे, बिभीषण थोरबोले, विलास थोरबोले यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या