21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादकळंब तालुक्यातील मंगरूळ येथे साडेपाच लाखांचे दागिने चोरीला

कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे साडेपाच लाखांचे दागिने चोरीला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे ५ ते ६ ऑगस्टच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून ५ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मंगरूळ येथील खंडू रावसाहेब भराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील बोंद्रे वस्तीत राहणारे खंडू रावसाहेब भराडे यांच्या राहत्या घरात ५ ते ६ ऑगस्टच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पेटीत असलेले ५ लाख ३० हजार १८० रूपये किंमतीचे १०१ ग्रॅम ७८० मिली वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी खंडू भराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या