23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeउस्मानाबादगजानन महाराजांच्या पालखीचे उस्मानाबाद शहरात आगमन

गजानन महाराजांच्या पालखीचे उस्मानाबाद शहरात आगमन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र शेगाव (जि. बुलडाणा) येथून पंढरपुकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखीचे गुरुवारी दि. ३० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहरात आगमन झाले. पालखीचे शहरात आगमन होताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी पालखीचे स्वागत केले.

उस्मानाबादपासून १२ किलोमीटरवर असलेल्या उपळा (मा) येथे पालखीचा मुक्काम होता. गजानन महाराजांची पालखी उस्मानाबाद शहरात येणार असल्याने नगर परिषद, काही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींनी पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. तेरणा महाविद्यालयापासून दत्तनगर, भानूनगर, सेंट्रल बिल्डींग, पोलिस मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, पंचायत समिती, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक आदी ठिकाणी पालखी मार्गावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दुपारी दोनच्या सुमारास पालखी लेडीज क्लबच्या मैदानावर आली. येथे पालखीचा मुक्काम आहे. या ठिकाणी शहरासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालखी मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी दि. 1 जुलै रोजी पहाटे तुळजापुरकडे रवाना होईल.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या