22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादगर्दीचा फायदा घेऊन रोख रकमेसह मोबाईल लंपास

गर्दीचा फायदा घेऊन रोख रकमेसह मोबाईल लंपास

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधील मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सदर घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील विमल बिक्कड या २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ढोकी येथील पेट्रोल पंप चौकात उभ्या होत्या. यावेळी त्यांना प्रवास करण्यासाठी बस आल्याने त्या बसमध्ये चढत होत्या.

यावेळी गर्दीचा फायदा घेऊन बिक्कड यांच्या पर्समध्ये ठेवलला स्मार्टफोन (अंदाजे ८ हजार किंमत) व रोख २५ हजार रूपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नकळत चोरून नेली. आपल्या पर्समधून रोख रक्कम व मोबाईल लंपास झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिक्कड यांनी ढोकी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध २६ ऑगस्ट रोजी भादंसं कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या