धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील एकाने 14 मार्च रोजी रात्री डायल 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना गोळीबार झाल्याची खोटी माहिती दिली. या प्रकरणी ज्ञानेश्वर अण्णासाहेब साळवे याच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ज्ञानेश्वर अण्णासाहेब साळवे यांनी डायल 112 वर कॉल करुन सागिंतले की, माझ्या घरासमोर माझ्यावर फायर केला व मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तामलवाडी पोलीस सदर ठिकाणी डायल 112 गाडीसह गेले. पोलिसांनी ज्ञानेश्वर साळवे यांच्याकडे चौकशी केली असता सदर ठिकाणी काहीही घटना घडली नसल्याचे दिसून आले. तसेच पोलीसांना तो दारूच्या अमंलाखाली असल्याचे समजले. त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्यावर पोलीसांना खोटी माहिती दिल्याने त्याच्यावर तामलवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी यांनी जनतेस आवाहन केले आहे की, डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्यास आपणावर प्रचलित काद्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.