24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउस्मानाबादतुळजापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था

तुळजापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे. १४ मे रोजी छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंती दिवशी नगर परिषद प्रशासनाने मंडपसुद्धा मारला नव्हता. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे राणी लक्ष्मीबाई उद्यान आहे. या उद्यानात छत्रपती संभाजी महाराज पुतळा आहे. मात्र, नगरपालिकेच्या वतीने पुतळ्याची रंगरंगोटी करण्यासह उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी झुला, घसरगुंडी इतर सुविधा पुरविण्याकडे कानाडोळा होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरूस्ती करून उद्यानात सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या