22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादतुळजापूर येथे चारचाकी वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू

तुळजापूर येथे चारचाकी वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेला चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तुळजापूर शहरात घडली असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात 22 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील रतनबाई काशीनाथ चंदनशिवे, (वय 65) वर्षे ह्या 18 ऑगस्ट रोजी दुपारी तुळजापूर येथील डुल्या मारुती मंदीरामागील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 43 एल 3337 हे निष्काळजीपणे चालवल्याने रतनबाई यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत रतनबाई चंदनशिवे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. या प्रकरणी मयताचा नातू अजित चंदनशिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 22 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या