28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबाददोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग; गुन्हा दाखल

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग; गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील 14 व 13 वर्षीय अशा दोन्ही बहिणी (नाव- गाव गोपनीय) 19 ऑगस्ट रोजी शाळेतून घरी परतत असताना त्याच गावातील तीन तरूणांनी त्यांना अडवून त्या दोघींस लज्जा वाटेल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एका गावातील 13 व 14 वर्षीय अल्पवयीन मुली 22 ऑगस्ट रोजी रस्त्याने जात होत्या. यावेळी तीन तरूणांनी त्यांचा विनयभंग केला. त्या मुलींच्या कुटूंबियांनी त्या तिघांना जाब विचारला असता त्या तिघांसह त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी 22 ऑगस्ट रोजी त्या मुलींच्या घरासमोर तलवार व सुरी घेऊन जाऊन मुलींच्या पित्यास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घराच्या दरवाजावर लाथा मारून तेथून पसार झाले. याप्रकरणी पीडितांच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरूद्ध कलम 354, 143, 147, 148, 149, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम 12 व शस्त्र कायदा कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या