धाराशिव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुला गुप्ता व अपर जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान येथे असलेली चंदनाची झाडे चोरट्यांनी लंपास केली. ही घटना 27 मार्च रोजीच्या रात्री घडली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय निवासस्थाने आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान समोरील अंदाजे 15 हजार रूपये किंमतीचे चंदनाचे झाड हे दि.27 मार्च रोजी रात्री चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी सुधीर भानुदास इंगळे, धंदा नोकरी रा. पंचायत समिती शासकिय निवासस्थान क्रं 14 उस्मनाबाद यांनी दि.27 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.