उस्मानाबाद : बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत उस्मानाबाद तालुक्यातील आकुबाई पाडोळीचे दोघेजण जागीच ठार झाले आहेत. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लातूर ते तुळजापूर रोडवर करजखेडा चौकाजवळ घडली. या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आकुबाई पाडोळी ता. उस्मानाबाद येथील तुकाराम व्यंकट गुंड (वय 40) व काकासाहेब शाहुज गाते (वय 45) हे दोघे दि. 26 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एनएच 361 लातुर ते तुळजापूर रोडलगत करजखेडा चौकात रस्त्याने मोटरसायकलवर प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात बस चालकाने बस क्रं एमएच 24 एयु 7718 ही बस भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने दुचाकीला समोरुन धडक दिली.
या अपघातात तुकाराम गुंड व काकासाहेब गाते हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. या प्रकरणी मयताचे भाऊ राजेंद्र व्यंकट गुंड यांनी दि. 27 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), अंतर्गत बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.