16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeउस्मानाबादभाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे डिसेंबरमध्ये उस्मानाबाद दौ-यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे डिसेंबरमध्ये उस्मानाबाद दौ-यावर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत, अशी माहिती भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी दिली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात पाच अथवा सहा तारखेला आ. बावनकुळे जिह्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 16 नोव्हेंबर ला पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. प्रतिष्ठाण भवन झालेल्या या बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ऍड. मिलींद पाटील, नेताजी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, सुधीर पाटील, ऍड. नितीन भोसले उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्षांच्या या दौ-यर्ची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाचा जिल्हा संघटनात्मक मेळावा, भाजयुमोची बाईक रॅली, बैठका, पत्रकारांशी वार्तालाप, युवा शाखांचे उद्घाटन, केंद्र शासनाच्या लाभार्थ्यांकडून धन्यवाद…मोदीजी अशा आशयाचे पोस्ट कार्ड लिहुन घेणे, बूथ स्तरावरील पोस्ट कार्ड लिहुन घेणे, बूथ स्तरावरील बूथ कमिटीची बैठक, नवमतदारांशी संवाद साधने, नियोजित जिल्हा भाजपा कार्यालय इमारत भुमिपूजन आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यामुळे हा दौरा राज्यात प्रभावशाली ठरेल. त्यासाठी विविध समित्या नियुक्त करुन अनेकांवर जबाबदारी दिली जाईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या