22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादभूम येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉटची विक्री, 8 जणांवर गुन्हा

भूम येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉटची विक्री, 8 जणांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेवून भूम येथे एकाच्या प्लॉटची बनावट कागदपत्रे बनवून विक्री केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून 8 जणांच्या विरोधात 23 ऑगस्ट रोजी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम येथील महंमद काझी हे बाहेरगावी औरंगाबाद येथे राहत आहेत. त्याचा फायदा घेवून शकीला सय्यद यांनी महंमद काझी यांच्या भूम येथील वडीलोपार्जीत भुखंडाचे बनावट दस्तऐवज तयार केले व तो प्लॉट नौशादबेग व तोसीफ मोगल यांना विक्री केला.

हा व्यवहार फसवा असल्याचे माहित असतानाही शरशादबेग मोगल व जहीरोद्दीन ईनामदार यांनी शकीला सय्यद यांना त्याकामी मदत केली. नगर परिषद कर्मचारी नसीम मन्यार यांनी महंमद यांच्या घरावर जाहीर प्रगटन न डकवता तसे डकवल्याचा खोटा पंचनामा असीफ व शाहीद यांच्या साक्षीने बनवला. अशा प्रकारे शकीला सय्यद, रा. वरवंटी, ता. उस्मानाबाद, नौशादबेग मोगल, तोसीफ मोगल, शरशादबेग मोगल, जहीरोद्दीन ईनामदार, असीफ पठाण, शाहीद काझी, नसीम मन्यार, (सर्व रा. भूम) या 8 आरोपींनी महंमद काझी यांच्या वडीलोपार्जीत प्लॉटची विक्री करुन फसवणूक केली. या प्रकरणी महंमद काझी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी, भूम येथे फिर्याद दिल्याने न्यायालयाच्या आदेशावरुन 8 जणांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या