उस्मानाबाद : एका महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे. येरमाळा ता. कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत 20 जून 2016 रोजी खुनाची घटना उघडकीस आली होती. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी सांगितलेली हकिकत अशी की, 20 जून 2016 रोजी येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येरमाळा घाटात बार्शीकडे जार्णाया रस्त्यावर पाझर तलावाच्या जवळ एका अनोळखी महिलेचे सडलेले प्रेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. प्रेताची ओळख पटविण्यासाठी प्रेताच्या हाडाचे नमुने डीएनए करिता घेण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे किरण मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 302, 201 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम जाधव यांनी केला. तपासामध्ये होळ जि. बीड येथील उषा अर्जुन कसबे नावाची महिला तीन दिवसापासुन बेपत्ता असल्याची कळाल्याने तपासिक अधिकारी यांनी सदर महिलेचा मुलगा पंकज अर्जुन कसबे याच्या रक्ताचे नमुने ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात आले. हे नमुने वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई येथे पाठविण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर असे निष्पन्न झाले की पंकज कसबे हा अनोळखी प्रेताचा मुलगा आहे. त्यावरून तपासिक अधिकारी यांनी विविध साक्षिदारांकडे चौकशी करून जबाब नोंदविले.
मयत उषा अर्जुन कसबे हिचे पुर्वीचे नाव बसवण्णा रुद्राप्पा जलगेरी असे होते. ती मुळची बेनकट्टी जि. बेळगाव (कर्नाटक राज्य) येथील होती. सदर महिला व आरोपी अर्जुन कसबे हे इचलकरंजी येथे गुत्तेदाराकडे एकाच ठिकाणी काम करण्यास होते. त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. बसवण्णा उर्फ उषा हिस पुर्वीच्या पतीकडून पंकज नावाचा मुलगा आहे. त्यानंतर आरोपी व बसवण्णा उर्फ उषा मुलगा पंकज सह आरोपीच्या होळ जि. बीड गावी वास्तव्यासाठी आले. ते एका भाड्याच्या घरात लग्न न करता पती पत्नीसारखे राहत होते. 9 जून 2016 रोजी आरोपीने दुर्सया मुलीशी लग्न केल्यानंतर मयत व आरोपी यांच्यात नेहमी भांडणे होत असे. 17 जून 2016 रोजी आरोपीने मयत बसवण्णा हिस आजारी असल्याने लातुरला दवाखान्यात घेवून जातो असे पंकज या खोटे सांगून येरमाळा घाटाजवळ तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. अंगावरील साडी व रक्ताने भरलेला शर्ट गावाकडे येताना वाटेत फेकुन दिला. अंगावरील सोन्याचे डोरले व मणीमंगळसुत्र गावातीळ होळ येथील सोनाराला विकले.
तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर उस्मानाबाद यांच्या न्यायालयात पुर्ण झाली. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने एकूण 26 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी व मयताच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन, आरोपी व मयत यांना मृत्यूपुर्वी एकत्र पाहणारे साक्षीदार, जसे की, मुलगा पंकज, बांधकाम गुत्तेदार, होळ येथील सोनार,वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. सदरचे प्रकरण हे संपुर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते. अभियोग पक्षातर्फे न्यायालयात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांंनी घेतलेले साक्षीदारांचा पुरावा व त्याचा युक्तीवाद ग्रा धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अर्जुन किसन कसबे यास भादवि कलम 302, 201 नुसार दोषी ठरवून कलम 302 अन्वये जन्मठेप व 500 रुपये दंड तसेच कलम 201 अन्वये 3 वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड अशी शिक्षा 18 मे 2022 रोजी सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ सुधाकर सगर यांनी काम पाहिले. ह्याात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्विंिमग पूल सुरू करण्यात आलेले आहेत. सध्या शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे लहान मुले, तरुण या स्विंिमग पूलमध्ये मोठी फीस भरुन पोहायला शिकण्यासाठी तसेच अनेकजण पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जात आहेत. परंतु, या सगळ्या स्विंिमग पूलच्या देखभालीसाठी कुठेही प्रशिक्षित ट्रेनर उपलब्ध नाही. एखाद्या ठिकाणी ट्रेनर असला तरी तो मुले पोहत असताना जागेवर हजर नसतो. स्विंिमग पूल चालवर्णायांच्या निष्काळजी कारभारामुळे गेल्या आठवडाभरात दोन मुलांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये प्रचंड भीती पसरली आहे. या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करुन दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर मसूद शेख, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, पृथ्वीराज चिलवंत, गणेश खोचरे, मोईनोद्दीन पठाण, कादरखान पठाण, बाबा मुजावर, नाना घाटगे, अन्वर शेख, मन्सूर काझी, इस्माईल काझी, सिद्धीक काझी, समीयोद्दीन मशायक, सय्यद मुस्तकीमोद्दीन कादरी, एजाज कैसर काझी, बंडू आदरकर, बिलाल तांबोळी, अफजल सय्यद आदी नागरिकांची स्वाक्षरी आहे.