21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादडेबिट कार्ड सत्यापनाच्या नावाखाली १ लाख ६० हजार रूपयाला घातला गंडा

डेबिट कार्ड सत्यापनाच्या नावाखाली १ लाख ६० हजार रूपयाला घातला गंडा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : डेबिट कार्ड सत्यापन करावयाचे आहे. त्यासाठी तुमच्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती मागून घेऊन अज्ञात व्यक्तीने एकाची १ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केली. सदर घटना वाशी तालुक्यातील पारगाव येथे घडली.

वाशी तालुक्यातील पारगाव येथील अनिल नारटा यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून २५ जुलै रोजी फोन आला. फोनवरील अज्ञात व्यक्तीने नारटा यांना डेबिट कार्ड सत्यापन करावयाची आहे. त्यासाठी तुमच्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती सांगा, असे सांगितले. त्यावर नारटा यांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता किंवा कॉलसंदर्भात सत्यता न पडताळता फोनवरील अज्ञात व्यक्तीस आपल्या डेबिट कार्ड व बँक खात्याची वैयक्तीक माहिती सांगितली. तसेच मोबाईलवर लघु संदेशाद्वारे प्राप्त झालेला ओटीपी क्रमांकही अनोळखी व्यक्तीस सांगितला.

नारटा यांची सर्व डेबिट कार्ड व बँकेची माहिती मिळाल्यानंतर फोनवरील अज्ञात व्यक्तीने नारटा यांच्या बँक खात्यातील तब्बल १ लाख ५९ हजार ९०० रूपये रक्कम ऑनलाईन पद्धतीने इतरत्र स्थलांतरीत केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नारटा यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात फोन करणार्‍या व्यक्तीविरूद्ध भादंसं कलम ४२० सह आयटी अ‍ॅक्टचे कलम ६६ अन्वये ६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या