ढोकी परिसरात अवकाळी पाऊस
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी परिसरात मंगळवारी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास ४५ मिनिटे हा पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच फळझाडे, उन्हाळी पिकांची मोठी हानी झाली आहे.
वादळी वा-यासह जवळपास २५ मि. मी. पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मागच्या दोन दिवसांपासून उघाड मिळाली होती. त्यामुळे शेतकरी शेतीकामाला लागला होता. मात्र, आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.