33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद लोहारा तालुक्यात एकाच दिवशी १५ रुग्ण

लोहारा तालुक्यात एकाच दिवशी १५ रुग्ण

एकमत ऑनलाईन

लोहारा : तालुक्यातील आष्टा कासार येथे रविवारी (दि.९) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ४५ रॅपिड एंटीजन टेस्ट तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आष्टा कासार गावात एकाच दिवशी ११ जण पॉजिटिव्ह आले आहेत. तर ८ नागरिकांचे औरंगाबाद येथील अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले असुन ८ पैकी ४ जणांचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह, ३ जण निगेटिव्ह तर एक अनिर्णीत आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली आहे.

लोहारा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तालुक्यातील अनेक गावात आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातील आष्टा कासार गावात (दि.२०) ऑगस्टला काल्याचे किर्तन हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

आष्टा कासार येथे यापूर्वी कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला होता. एकाच दिवशी १५ रुग्ण आढळल्याने कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांचे हायरिस्क संपर्क शोधून त्यामधील ज्यांचे संपर्कापासून पाच दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांचे तसेच कार्यक्रमात सहभागी झालेले परंतु टेस्ट न झालेले अश्या सर्व नागरिकांची आता दररोज तपासणी केली जाणार आहे. आष्टा कासार प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ श्री. ढोले, अचलेर उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पवार यांना स्वब टेस्टिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आष्टा कासार येथील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत टेस्टिंग सुरु राहणार असल्याचे डॉ अशोक कटारे यांनी सांगितले.

चक्क डॉक्टरने केली रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या