21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादतेर येथून २.५० लाखाची दारु जप्त

तेर येथून २.५० लाखाची दारु जप्त

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथे पोलीसांनी छापा टाकून गोवा राज्य बनावटीची २ लाख ४६ हजार रुपये किंमतीची अवैध विक्रीसाठी ठेवलेली दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटे दि. ७ जुलै रोजी ढोकी पोलीसांच्या पथकाने केली. या प्रकरणी रविंद्र जालिंदर राऊत यांना अटक केली आहे.

ढोकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेर येथील रविंद्र जालिंदर राऊत याच्या घरी अवैध मार्गाने विक्री करण्यासाठी देशी, विदेशी दारुचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांनी गुप्त बातामीदारामार्फत मिळाली होती. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, कळंबचे उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश राऊत यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे तेर येथील रविंद्र जालिंदर राऊत याच्या घरी छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्य निर्मित विविध कंपनीची २ लाख ४६ हजार रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त केली. पोलिसांनी रविंद्र राऊत याला अटक करून त्याच्या विरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई पथकामध्ये सपोनि जगदिश राऊत, पोलिस नाईक श्रीमंत क्षीरसागर, पोना प्रकाश तरटे, पोना खोकले, पोकॉ सुभाष साखरे, महिला पोकॉ मोरे, चालक तुरेवाले यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या