21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeउस्मानाबादयेडशी दुकान फोडीतील २ आरोपींना अटकेत

येडशी दुकान फोडीतील २ आरोपींना अटकेत

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे ३१ जुलैच्या रात्री मोबाईल शॉपीचे दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपनीचे मोबाईल व रोख रक्कम लंपास केली होती. या दुकान फोडीतील २ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी ता. उस्मानाबाद येथील मझहर पटेल यांचे येडशी बस स्थानकासमोर मोबाईल शॉपीचे दुकान आहे. हे दुकान चोरट्यांनी दि. ३१ जुलै ते दि. १ ऑगस्टच्या रात्री फोडून दुकानातील ओप्पो कंपनीचा १, रियल मी कंपनीचा १ व विवो कंपनीचे २ असे एकुण ४१ हजार रुपये किंमतीचे ४ स्मार्टफोन चोरुन नेले होते. या प्रकरणी मझहर पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळंब उपविभागात गस्तीस असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अनिल जांभा काळे उर्फ संतोष, रा. पाथर्डी याच्यासह त्याचा मित्र महादेव राजेंद्र काळे, रा. आंदोरा हे दोघे अनेक मोबाईल फोन बाळगून आहेत. यावरून पोलीसांनी मंगळवारी दि. २ ऑगस्ट रोजी त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात चोरीच्या ४ स्मार्टफोनसह अन्य २ स्मार्टफोन आढळल्याने ते स्मार्टफोन जप्त केले. त्यांना अटक करुन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. तसेच पोलीस त्याच्या तीसर्‍या साथीदाराचा शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि रामेश्वर खनाळ, सपोनि मनोज निलंगेकर, पोहेकॉ जावेद काझी, प्रकाश औताडे, पोना- शोकत पठाण, होळकर, मस्के यांच्या पथकाने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या